Header Ads

मारुती स्तोत्र | Maruti Stotra in Marathi With PDF | Maruti Stotra pdf 

मराठी मध्ये पूर्ण भीमरुपी महारुद्र मारुती स्तोत्र ( bhimrupi maharudra maruti stotra in Marathi) वाचा. येथे दररोज वाचण्यासाठी आणि जप करण्यासाठी मराठी भाषेत पूर्ण मारुती स्तोत्र आहे. तसेच, मराठी भाषेत मारुती स्तोत्र पीडीएफ (Maruti Stotra pdf) डाउनलोड करा.

Maruti Stotra in Marathi With PDF
Maruti Stotra Lyrics in Marathi


भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ।।१।।

महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें ।
सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका ।।२।।

दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा ।
पाताळदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ।।३।।

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ।।४।।

ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोटला पुढें ।
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ।।५।।

ब्रह्मांडे माईलें नेणों, आवळे दंतपंगती ।
नेत्राग्नीं चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ।।६।।

पुच्छ ते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरीं ।
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ।।७।।

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ।।८।।

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ।।९।।

आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती ।
मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ।।१०।।

अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठे, मेरू मंदार धाकुटे ।।११।।

ब्रह्मांडाभोवतें वेढें, वज्रपुच्छें करू शकें ।
तयासी तुळणा कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ।।१२।।

आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढें, भेदिलें शून्यमंडळा ।।१३।।

धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ।।१४।।

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही ।
नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ।।१५।।

हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळागुणें ।।१६।।

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू ।
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ।।१७।।

॥इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम्॥

Maruti Stotra Image Lyrics

Download in HDMaruti Stotra PDF Download

आपल्या मोबाइलला मध्ये मारुती स्तोत्र pdf (Maruti Stotra in marathi pdf ) डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here To Download


Read

श्री गणपती स्तोत्र

माता अर्गला स्तोत्र

माँ दुर्गा स्तोत्र

आदित्य हृदय स्तोत्र

Post a Comment

Previous Post Next Post